न्यूयार्क : ऑक्टोबर २०२०- सप्टेंबर २०२१ या हंगामात जागतिक स्तरावर साखरेचा पुरवठा १.५१ मिलियन टनाने कमी होऊनही आगामी २०२१-२२ या हंगामात २.७४ मिलियन टन साखर अतिरिक्त असेल असे अनुमान साखर आणि इथेनॉल उद्योगातील कन्सल्टन्सी डाटाग्रोने वर्तविला आहे.
डाटाग्रोचे मुख्य विश्लेषक प्लिनियो नास्तारी यांनी सांगितले की, भारतात यंदा चांगले साखर उत्पादन झाले आहे. तर युरोपमध्ये चांगल्या प्रतिची साखर उपलब्ध झाल्याने साखर उत्पादनात वाढीची चिन्हे दिसत आहेत. २०२०-२१ मध्ये ब्राझिलमध्ये साखर उत्पादन ३८.५ मिलियन टनापासून ३६.३ टनापर्यंत घसरण्याची शक्यता असतील तरी जागतिक बाजारापेठेत साखर साठा अतिरिक्त असेल.
नास्तारी यांनी बुधवारी आपल्या अहवालात म्हटले की, आम्हाला अपेक्षा आहे, की गेल्यावर्षीच्या चांगल्या पिक उत्पादनानंतर भारतात २०२१-२२ मध्ये सुमारे ३० मिलियन टन साखरेचे उत्पादन होईल. थालयंडमध्ये उसाची लागवड ६६ मिलियनवरून ८५ मिलियनपर्यंत वाढली आहे. त्यामुळे देशातील साखर निर्यात ३.९ मिलियन टनावरून ५.८ मिलियन टनापर्यंत वाढण्याची शक्यता आहे. डाटाग्रोच्या अपेक्षानुसार २०२१-२२ मध्ये रशियातील साखर उत्पादन १८.५ टक्क्यांनी वाढून ६.१ मिलियन टन होईल. मात्र, चांगला पुरवठा आणि मागणी असूनही बाजार अस्थिर राहील अशी शक्यता डाटाग्रोने व्यक्त केली आहे.