राज्यांनी हँड सॅनिटायझर उत्पादकांना आवश्यक मंजूरी देण्याची केंद्र सरकारची सूचना

नवी दिल्ली : सर्व राज्य सरकारांनी ३१ डिसेंबर २०२१ अखेर आणखी एक वर्षासाठी डिस्टिलरी आणि अन्य युनीटला हँड सॅनिटायझर उत्पादनासाठी आवश्यक त्या मंजुरी द्याव्यात अशी सूचना केंद्रीय ग्राहक व्यवहार, अन्न व सार्वजनिक वितरण मंत्रालयाने केली आहे. याबाबत साखर आणि प्रशासन विभागाच्या संयुक्त सचिवांनी राज्यांच्या मुख्य सचिवांना पत्र लिहिले आहे. बहुतांश सरकारांनी हँड सॅनिटायझर उत्पादकांसाठी डिस्टीलरी, इतर युनिटसाठी लायसन्स जारी केले होते. त्यामुळे अशा प्रयत्नांतून हँड सॅनिटायझरची प्रती दिन उत्पादन क्षमता ३० लाख लिटरपर्यंत वाढविली जाऊ शकते. आणि ४.२ कोटी लिटरहून अधिक हँड सॅनिटायझरचे उत्पादन केले जाऊ शकते.

पत्रात म्हटले आहे की, यापूर्वी हँड सॅनिटायझरच्या निर्यातीस मंजुरी देण्यात आली आहे. आता भारत इतर देशांना सॅनिटायझरची निर्यात करीत आहे. ३१ डिसेंबर २०२० पर्यंत डिस्टीलरींना हँड सॅनिटायझरसाठी परवानगी दिली आहे. कोविड महामारी अद्याप संपलेली नाही. या लढाईत हँड सॅनिटायझर खूप महत्त्वाचे आहे असे संयुक्त सचिवांनी म्हटले आहे. त्यांनी राज्य सरकारांना अन्न, औषध प्रशासन तसेच सक्षम अधिकाऱ्यांना राज्यात डिस्टीलरी, युनीट मॅन्युफॅक्चरिंग हँड सॅनिटायझरला आवश्यक मंजुरी देण्यासाठी दिशानिर्देश द्यावेत असे म्हटले आहे. त्यातून देशांतर्गत बाजारपेठेत योग्य दरात हँड सॅनिटायझर पुरेसे उपलब्ध होईल असे सचिवांनी म्हटले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here