हवाना : रॉयटर्स वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, क्यूबा मध्ये एका दशकाहून अधिक काळातनंतर, २०२१ मध्ये सर्वात कमी ऊस आणि साखर उत्पादन होण्याची शक्यता आहे. कोविड १९ महामारी, लागू केलेले निर्बंध यामुळे इंधन, कृषी साहित्य खरेदीसाठी परकीय चलनाची कमतरता असल्याने ऊस पिकावर मोठा परिणाम झाला आहे. त्यामुळे यावर्षाच्या सुरुवातीला जाहीर केलेल्या १.२ मिलियन उद्दीष्टाच्या तुलनेत ८,१६,००० टन उत्पादन होण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. हे उत्पादन १९०८ नंतर सर्वात कमी आहे.
साखर संघाचे उपाध्यक्ष जोस कार्लोस सेंटॉस फेरर यांनी १० मे रोजी सांगितले की, एप्रिल अखेरपर्यंत उत्पादनाचे उद्दीष्ट ६८ टक्के होते. क्युबामध्ये देशांतर्गत बाजारात वर्षात ६,००,००० ते ७,००,००० टन साखरेची विक्री होते. तर ४,००,००० टन साखर निर्यात केली जाते. यंदा साखरेचे कमी उत्पादन पाहता साखर निर्यात कमी केली जाण्याची शक्यता आहे.