किनौनी साखर कारखान्याच्या १७ व्या गाळप हंगामाची समाप्ती

मेरठ : किनौनी येथील बजाज शुगर मिलने बुधवारी रात्री आपल्या कार्यक्षेत्रातील सर्व उसाचे गाळप करून १७ व्या गळीत हंगामाची समाप्ती केली. चालू हंगामात कारखान्याने आपल्याला मंजुर झालेल्या उसाच्या कोट्यापेक्षा पाच लाख क्विंटल ऊसाच्या अतिरिक्त गाळप करून उच्चांक प्रस्थापित केला आहे.

बजाज शुगरने एक नोव्हेंबर रोजी आपल्या १७ व्या गाळप हंगामाला प्रारंभ केला होता. १९२ दिवसांच्या गाळप कालावधीत एक कोटी ८५ लाख क्विंटल उसाचे गाळप करून ११.९७ टक्के साखर उतारा मिळवला आहे. एकूण २१.६३ लाख क्विंटल साखरेचे उत्पादन करून उत्तर प्रदेशात उसाच्या रिकव्हरीत सहावा क्रमांक पटकावला आहे. तर कारखाना गाळपात सातव्या क्रमांकावर आहे.

किनौनी कारखान्याचे युनीट हेड के. पी. सिंह यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, लखनौ येथील आयुक्तांनी आपल्या ऊस मंजुरी आदेशात १८५ ऊस खरेदी केंद्रे मंजूर करून एक कोटी ८० लाख क्विंटल ऊस खरेदेची टार्गेट दिले आहे. कारखान्याने आपले हे टार्गेट पूर्ण करूण पाच लाख क्विंटल अतिरिक्त गाळप केले आहे. शेतकऱ्यांनी आपल्या शेतातील उसाचा पु्न्हा सर्व्हे करून ऊस खरेदी करून गाळप पूर्ण केले. बुधवारी हंगामाची समाप्ती करण्यात आली. चालू हंगामात ३० नोव्हेंबरअखेर खरेदी केलेल्या उसाचे पैसे ऊस समित्यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या खात्यावर पाठविण्यात आले आहेत. ऊस विभागाचे महा व्यवस्थापक राजकुमार टाया यांनी सांगितले की, सरकारने निश्चित केलेल्या साखर विक्रीतील ८५ टक्के पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावर पाठविण्यात आले आहेत. जशा पद्धतीने साखर विक्री वाढेल, तसतसे शेतकऱ्यांना पैसे गतीने दिले जातील.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here