सहारनपूर: समाजवादी पार्टीचे जिलाध्यक्ष रुद्रसेन चौधरी यांनी कोरोना महामारीमुळे ऊस बिले त्वरीत मिळावीत आणि विज बिल माफ करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.
सद्यस्थितीत शेतकऱ्यांना कोरोना महारोगराईमुळे अडचणीच्या स्थितीला सामोरे जावे लागले आहे. समाजातील सर्व घटकांचे व्यवसाय, कामकाज बंद असल्याने त्यांच्यासमोर परिस्थिती अधिक बिकट झाली आहे असे समाजवादी पार्टीचे जिल्हाध्यक्ष रुद्रसेन चौधरी म्हणाले.
भारत हा कृषी प्रधान देश आहे. शेतकरी समाजाचा मुख्य घटक आहेत. महामारीच्या कालावधीत शेतकऱ्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. उत्तर प्रदेशच्या पश्चिम भागात ऊसाचे पैसे न मिळाल्याने शेतकऱ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे. सहारनपूर जिल्ह्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे सुमारे ७०० कोटी रुपये साखर कारखानदारांनी थकवले आहेत. सद्यस्थितीत शेतकऱ्यांच्या अडचणी लक्षात घेऊन हे पैसे व्याजासह मिळाले पाहिजेत. याशिवाय राज्यातील शेतकऱ्यांचे कोरोना कालावधीतील विज बिल माफ करून त्यांना दिलासा देण्याची गरज आहे, असे चौधरी यांनी सांगितले.