नवी दिल्ली : उत्तर प्रदेशमधील गाळप हंगाम सध्या अंतिम टप्प्यात आहे. सद्यस्थितीत काही कारखानेच गाळप करीत आहेत. यावर्षी राज्यात साखरेच्या उत्पादनात थोडी घसरण झाल्याचे दिसून आले आहे.
नॅशनल फेडरेशन ऑफ को-ऑपरेटिव्ह शुगर लिमिटेडने (NFCSF) दिलेल्या माहितीनुसार, उत्तर प्रदेशमध्ये १० मे २०२१ अखेर ३० साखर कारखाने सुरू आहेत. यंदा १२० साखर कारखान्यांनी गाळप हंगामात सहभाग नोंदवला होता. राज्यात आतापर्यंत १०७.७५ लाख टन साखर उत्पादन झाले आहे. गेल्यावर्षी याच कालावधीत १२० लाख टन साखर उत्पादन झाले होते.
राज्यात १० मे २०२१ पर्यंत ९९७.६९ लाख टन उसाचे गाळप करण्यात आले असून गेल्यावर्षी याच कालावधीत १०५२.६३ लाख टन उसाचे गाळप झाले होते. उत्तर प्रदेशमध्ये साखरेच्या उताऱ्यात घट दिसून आले आहे. १० मेपर्यंत साखर उतारा १०.८० टक्के आहे. तर गेल्यावर्षी साखर उतारा ११.४० टक्के होता.
एनएफसीएसएफने दिलेल्या माहितीनुसार देशात १० मेअखेर ६२ साखर कारखाने अद्याप गाळप करीत आहेत. यंदाच्या हंगामात ५०२ साखर कारखान्यांनी गाळप हंगामात सहभाग घेतला होता.