लाहोर : रमजानच्या महिन्यात ग्राहकांना साखरेच्या दरात काहीसा दिलासा मिळाल्यानंतर आता पुन्हा एकदा साखरेचा दर गगनाला भिडू लागला आहे. प्रसार माध्यमातील वृत्तानुसरा, साखर विभागातील एका अधिकाऱ्याने सांगितले की, सरकार द्वारे लागू केलेली साखरेच्या दराची मुदत संपत आली आहे. लाहोर उच्च न्यायालयाने फक्त रमजान महिन्यासाठी साखरेचा दर ८० रुपये करण्यास मंजुरी दिली होती. या कालावधीत १,५५,००० टन साखर निश्चित केलेल्या दरानेच रमजानसाठी खुल्या बाजारात देण्यात आली होती.
लाहोरमधील साखर वितरकांच्या प्रतिनिधीने सांगितले की, सोमवारी एक्स मील किंमत ९२.९३ रुपये प्रतिकिलोच्या दरम्यान राहील. पाकिस्तान शुगर मिल्स असोसिएशनच्या वरिष्ठ सदस्यांनी ईदच्या सुट्ट्या संपल्यानंतर साखरेच्या दरवाढीबाबत कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. मात्र, प्रत्यक्षात पंजाब प्रांतामध्ये कगेल्या महिनाभरात एक्स मिल किंमत ९० रुपये प्रती किलोच्या आसपास राहीला.
सद्यस्थितीत राज्यांतील विविध बाजारांमध्ये साखरेचे दर अधिक आणि सरकारने निश्चित केल्यापेक्षा अधिकच आहेत. प्रांतांमधील सरकारांनी कृषी अर्थशास्त्र विभागांद्वारे दिलेल्या किमतीनुसार, ५ मे रोजी लाहोरमध्ये घाऊक साखरेचा दर ९५०० प्रती १०० किलो राहीला. फैसलाबादमध्ये ८३०० रुपये, गुजरावालामध्ये ९५०० रुपये प्रती १०० किलो दर राहीला होता.