तेहरान : ईराणच्या उद्योग मंत्रालयातील धातूविरहित उद्योग विभागाच्या महासंचालकांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्यावर्षी ईराणमध्ये २.५ मिलियन टन साखरेचे उत्पादन करण्यात आले होते. देशांतर्गत मागणीची पूर्तता करण्यासाठी हे उत्पादन पुरेसे असल्याचे सांगण्यात आले.
प्रसार माध्यमांतील वृत्तानुसार, मंत्री मोहसीन सफदरी यांनी सांगितले की एक मिलियन टन उत्पादनासाठी कच्च्या मालाची आयात करण्यात आली होती. उर्वरीत १.५ मिलियन टन उत्पादनासाठी स्थानिक ऊस आणि चुकंदरचा वापर करण्यात आला होता. सद्यस्थितीत ईराणमध्ये ४९ साखर कारखाने दरवर्षी ५.३ मिलियन टन साखरेवर प्रक्रिया करण्याच्या क्षमतेने कार्यरत आहेत, असे मंत्री सफदारी यांनी सांगितले.