मेरठ : टिकोला साखर कारखाना रामराजने चालू गळीत हंगाम २०२०-२१ मधील दोन ते चार एप्रिल या कालावधीत खरेदी केलेल्या उसाचे पैसे समित्यांकडे पाठविले आहेत. रामराज समितीच्या सचिवांनी ऊस बिले पाठविण्यात आल्याच्या माहितीला दुजोरा दिला. कारखान्याचे इलेक्ट्रॉनिक डाटा प्रोसेसिंग मॅनेजर ऋषिपाल धामा आणि कार्यकारी अध्यक्ष एम. सी. शर्मा यांनी सांगितले की, कारखान्याने नऊ कोटी ७८ लाख रुपयांची बिले सर्व समित्यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना पाठवली आहेत. रामराज समितीचे सचिव सुभाष चंद्र यादव यांनी बिले देण्यात आल्याच्या माहितीस दुजोरा दिला. याबाबतच्या कागदपत्रांची पूर्तता झाल्यावर बँकांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना पैसे मिळतील असे त्यांनी सांगितले.