गेल्या २४ तासात देशात १,८६,३६४ नवे रुग्ण, ३,६६० जणांचा मृत्यू

नवी दिल्ली : गेल्या २४ तासात देशात कोरोना संक्रमणाचे नवे १,८६,३६४ रुग्ण आढळले असून ३,६६० जणांचा मृत्यू झाला. याच कालावधीत २,५९,४५९ जण पूर्णपणे बरे झाले. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशात एकूण कोरोना संक्रमितांची संख्या २,७५,५५,४५७ झाली आहे. उपचारानंतर संक्रमित झालेले २,४८,९३,४१० जण बरे झाले आहेत. कोरोना महामारीने आतापर्यंत ३,१८,८९५ जणांचा मृत्यू झाला आहे. देशात सक्रीय रुग्णसंख्या कमी होऊन २३,४३,१५२ झाली आहे. लसीकरण अभियानांतर्गत २०,५७,२०,६६० जणांना डोस देण्यात आला आहे.

दक्षिण भारतातील राज्यांमध्ये सर्वाधिक रुग्ण आहेत. गुरुवारी झारखंडमध्ये ६९५, आसाममध्ये ५७०४, गोव्यात १५०४, पंजाबमध्ये ३९१४, हरियाणात २३२२, महाराष्ट्रात २१२७३, मध्य प्रदेशमध्ये १९७७, तामीळनाडूत ३३,३६१, हिमाचल प्रदेशमध्ये १४७२, पश्चिम बंगालमध्ये १३०४६, उत्तराखंडमध्ये २१४६, तेलंगणामध्ये ३६१४, कर्नाटकात २४२१४, राजस्थानमध्ये ३४५४, आंध्र प्रदेशमध्ये १६,१७ नवे रुग्ण आढळले.

गुरुवारच्या आकडेवारीनुसार गेल्या २४ तासांत देशात ३८४७ जणांचा मृ्त्यू झाला. त्यामध्ये महाराष्ट्रात ९९२, कर्नाटकमध्ये ५३०, तामीळनाडूत ४७५, उत्तर प्रदेशमध्ये १९३, पंजाबमध्ये १८५, पश्चिम बंगालमध्ये १५३, केरळमध्ये १५१, दिल्लीत १३०, राजस्थानमध्ये १०७ आणि हरियाणात १०६ जणांचा मृत्यू झाला. आतापर्यंत देशात ३,१५,२३५ जणांचा मृत्यू झाल्याचे आरोग्य मंत्रालयाने सांगितले.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here