नवी दिल्ली : चीनी मंडी
इंडोनेशियाने त्यांच्या औद्योगिक वापरासाठी २८ लाख ३० हजार टन कच्ची साखर लागणार असल्याचे जाहीर केले आहे. इंडोनेशियाच्या व्यापार मंत्र्यांनी एका आंतराष्ट्रीय वृत्तसंस्थेला ही माहिती जाहीर केली आहे.
याबाबत इंडोनेशियाचे ओके न्यूरवान म्हणाले, ‘दर तीन महिन्यांना या कोट्याचा आढावा घेण्यात येणार आहे. त्यानंतर गरजेनुसार अनुकूल निर्णय घेतले जातील.’
गेल्या हंगामात इंडोनेशियाने कच्च्या साखरेचा आयात कोटा ३६ लाख टन जाहीर केला होता. पण, प्रत्यक्षात त्यांच्याकडून २७ लाख टन साखरच आयात करण्यात आली होती.