कॅथल : कॅथल येथील सहकारी साखर कारखान्याने आपल्या ९६.९६ टक्के क्षमतेचा वापर करून राज्यातील साखर कारखान्यांत पहिला क्रमांक पटकावला आहे. सहकारी साखर कारखान्याने गाळप हंगाम २०२०-२१ मध्ये ४१.४० लाख क्विंटल उसाचे गाळप करून ४.०१ लाख क्विंटल साखर उत्पादन केले. कारखान्याचे कार्यकारी संचालक विरेंद्र चौधरी यांनी संगितले की, कोरोनाच्या काळात कारखान्याचे कामकाज सुरळीत होते. त्यामुळे कर्मचारी, अधिकारी, ऊस उत्पादक अभिनंदनास पात्र आहेत.
काही कर्मचारी कोरोना संक्रमीत झाल्यानंतरही कारखान्याने चांगले काम केले. मुख्य अभियंता अदिल अहमद सिद्दिकी, मुख्य रसायनतज्ज्ञ कमलकांत तिवारी, कार्यकारी ऊस अधिकारी रामपाल सिंह यांना प्रशासनाने प्रशस्तीपत्र देऊन कौतुक केले. कारखान्याने या काळात स्वतःच्या ९६.९६ टक्के क्षमतांचा वापर करून प्रथम क्रमांक पटकावला. त्यामध्ये सर्वांचे योगदान होते. राज्य सरकारने सहकारी साखर कारखान्यांना तोट्यातून बाहेर काढण्यासाठी धोरण तयार केले आहे असे त्यांनी सांगितले. कारखान्याच्या क्षमतेमध्येही सुधारणा करण्यात येत आहे. गाळप क्षमता २५००० क्विंटल प्रति दिनवरून ३५,००० क्विंटल करण्यात येणार आहे. हा प्रस्ताव मंजूर झाला आहे. याशिवाय अतिरिक्त ४० केएलपीडी इथेनॉल प्लांट स्थारन करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत असे सूत्रांनी सांगितले.