नवी दिल्ली : इंधर दरात वाढीची प्रक्रिया सुरुच आहे. त्यामुळे सोमवारी राजधानी दिल्लीमध्ये पेट्रोलचा दर ९३.३१ रुपये प्रती लिटरवर पोहोचला तर मुंबई पेट्रोल १०१.५२ रुपये प्रती लिटर झाले. दिल्लीमध्ये डिझेलचा दर ८६.२२ रुपये प्रती लिटरवर आला तर मुंबईत डिझेल ९३.५८ रुपये प्रती लिटर दराने मिळत आहे.
इतर राज्यंमध्येही पेट्रोल, डिझेलच्या दरात वाढ झाल्याचे पहायला मिळाले. चेन्नईमध्ये पेट्रोल ९६.७१ रुपये प्रती लिटर आणि डिझेल ९०.९२ रुपये प्रती लिटर दराने मिळत आहे. कोलकातामध्ये पेट्रोलचा दर ९५.२८ रुपये प्रती लिटर आणि डिझेल ८९.०७ रुपये प्रती लिटर दराने विक्री केले जात आहे. मूल्यवर्धीत कराच्या आधारावर (व्हॅट) डिझेल आणि पेट्रोलचे दर विविध राज्यांमध्ये वेगवेगळे असतात.