मुरादाबाद : जिल्हा ऊस अधिकारी डॉ. अजय सिंह यांनी बिलारी सहकारी ऊस विकास समितीच्यावतीने सुरू असलेल्या ऊस सर्वेक्षणाची अचानक पाहणी केली. त्यांच्यासोबत साखर कारखाना आणि ऊस समितीची संयुक्त टीम सहभागी झाली होती. पाहणी दौऱ्यावेळी डॉ. सिंह यांनी सांगितले की, ऊसाच्या सर्व्हेत कोणत्याही प्रकारची गडबड होऊ नये. गोंधळ आढळून आल्यास दोषी व्यक्तींवर कडक कारवाई केली जाईल.
ऊस विभाग आणि बिलारी साखर कारखान्याच्या संयुक्त टीमकडून सर्वेक्षण सुरू आहे. जिल्हाऊस अधिकाऱ्यांनी शेर सिंह यांच्या शेतातील सर्व्हेची पडताळणी केली. शेतकरी जितेंद्र सिंह यांनी बिलारी कारखान्याने वेळेवर ऊस बिले दिल्याबद्दल प्रशासनाचे आभार मानले. यावेळी सहकारी ऊस विकास समितीचे सचिव घनश्याम, ऊस विकास निरीक्षक अरुण कुमार श्रीवास्तव, कारखान्याचे व्यवस्थापक प्रवीण सिंह आदी उपस्थित होते.