नवी दिल्ली : तेल कंपन्यांनी सोमवारी पेट्रोल-डिझेलच्या दरात पुन्हा वाढ केली. यापूर्वी रविवारी कोणतीही दरवाढ करण्यात आली नव्हती. आजच्या दरवाढीनंतर पेट्रोल-डिझेलचे दर उच्चांकावर पोहोचले आहेत. देशातील प्रमुख चार महानगरांमध्ये पेट्रोल २९ पैसे आणि डिझेल ३१ पैशांनी महागले. अनेक शहरांमध्ये दोन्हींचे दर १०० रुपयांपर्यंत पोहोचले. तर राजस्थानमधील गंगानगर मध्ये पेट्रोलचे दर विक्रमी स्तरावर आहेत. गंगानदरमध्ये पेट्रोल १०७.५३ रुपये प्रती लिटर तर डिझेल १००.३७ रुपये प्रती लिटरने विक्री सुरू आहे.
इंडियन ऑइल कॉर्पोरेशनने दिलेल्या माहितीनुसार, आज दिल्लीत पेट्रोल २९ पैशांनी महाग होऊन ९६.४१ रुपये आणि डिझेल ३० पैशांनी महाग होऊन ८७.२८ रुपये प्रती लिटरवर पोहोचले. ४ मेपासून दरवाढीचा सपाटा सुरू आहे. मे महिन्यात दिल्लीत पेट्रोल ३.८३ रुपये आणि डिझेल ४.४२ रुपयांनी महागले. जून महिन्यात आतापर्यंत पेट्रोल २.१८ रुपये आणि डिझेल २.१३ रुपयांनी वाढले आहे. मुंबईत पेट्रोल २८ पैसे तर डिझेल ३१ पैशांनी वाढले. तेथे एक लिटर पेट्रोल १०२.५८ रुपये आणि डिझेल ९४.७० रुपये झाले आहे. चेन्नईत पेट्रोल २६ पैशांनी महाग होऊन ९७.६९ रुपये आणि डिझेल २८ पैशांनी वाढून ९१.९२ रुपये प्रती लिटर दराने विकले जात आहे. कोलकातामध्ये पेट्रोल २८ पैशांनी आणि डिझेल २९ पैशांनी वाढले. तेथे पेट्रोल ९६.३४ रुपये तर डिझेल ९०.१२ रुपयांवर पोहोचले. राजस्थानच्या गंगानगरमध्ये डिझेल १०० रुपयांवर पोहोचले आहे.
चीनीमंडी चे अपडेट्स व्हाट्सअप वर मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
WhatsApp Group Link