नवी दिल्ली : भारतात शेती मोठ्या प्रमाणावर मान्सूनवर अवलंबून आहे. मध्य भारतातील राज्यातील अनेक राज्ये पावसावर अवलंबून आहेत. यंदा तेथे अधिक पावसाची शक्यता आहे. हवामान विभागाच्या म्हणण्यानुसार यंदा मध्य भारतात १०६ टक्के पावसाची शक्यता आहे.
केरळमध्ये मान्सूनच्या आगमनानंतर देशात पावसाने गती घेतली आहे. दोन तृतियांश भागात सध्या पाऊस सुरू आहे. आयएमडीच्या म्हणण्यानुसार, उत्तर भारताला भीषण उकाड्यापासून दिलासा मिळण्याची शक्यता आहे.
आयएमडीने सांगितले की, दक्षिण राजस्थान आणि गुजरातमधील कच्छ क्षेत्र वगळता पुढील दोन-तीन दिवसांत दक्षिण पश्चिम मान्सून देशात सक्रीय राहील. भारतात शेती पावसावर अवलंबून आहे. त्यामुळे यंदा पाऊस चांगला झाल्यास शेतीत बंपर उत्पादन दिसू शकेल. त्यामुळे शेतकऱ्यांच्या खिशात पैसे आल्यास त्याचा परिणाम इतर सेक्टर, कंपन्यांवर होईल. भारताच्या अर्थव्यवस्थेत ग्रामीण भागाचे योगदान अधिक आहे.
दिल्लीत १३ वर्षांपूर्वी, २००८ मध्ये मान्सूनच्या पावसाची सुरुवात वेळेआधी झाली होती. १५ जून रोजी पाऊस सुरू झाला होता. खरेतर यंदा पंजाबच्या काही भागात पाऊस सुरू झाला आहे. तो जूनच्या अखेरच्या आठवड्यात येतो. पंजाब, हरियाणामध्ये जूनमध्ये सुरुवातीला पाऊस झाला आहे. १ ते १४ जून या काळात दोन्ही राज्यात १४.७ मी.मी. पाऊस होतो. यंदा पंजाबमध्ये ३८ मिमी पाऊस झाला आहे. तर हरियाणात ३३.७ मीमी पावसाची नोंद झाली. पंजाबमध्ये १५८ टक्के जादा पाऊस झाला. तर हरियाणात आतापर्यंत १४६ टक्के जादा पाऊस झाला आहे. जूनच्या पंधरवड्यात हिमाचल प्रदेशमध्ये ३३.५ मीमी पाऊस होतो. यंदा तो २६ टक्क्यांनी वाढून ४२.२ मिमी पर्यंत झाला आहे. उत्तर भारतात लवकर पाऊस पोहोचल्याचा फायदा पंजाब, हरियाणासारख्या कृषीप्रधान राज्यांत दिसू शकेल.
चीनीमंडी चे अपडेट्स व्हाट्सअप वर मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
WhatsApp Group Link