कॅनबेरा : ऑस्ट्रेलियन मेडिकल असोसिएशनने (एएमए) साखरयुक्त पेयांवर कर लागू करण्यासाठी दबाव आणल्याच्या प्रकाराचा ऑस्ट्रेलियन टॅक्सपेअर अलायन्सने (एटीए) निषेध केला आहे.
एटीएचे अध्यक्ष ब्रायन मार्लो यांनी याबाबत आपली भूमिका मांडताना म्हटले आहे की, या करामुळे फक्त महसूल वाढेल. इतर कोणताही फायदा होणार नाही. मेक्सिकोमध्ये शुगर टॅक्स लागू झाल्यानंतर नागरिक चॉकलेट, मिठाई अधिक खाऊ लागले. कॉर्नेल विद्यापीठाच्या संशोधकांना सहा महिन्यांच्या कालावधीत केलेल्या पडताळणीत असे आढळले की, अमेरिकेत कॅलरीयुक्त उत्पदनांवर १० टक्के कराचा बोजा वाढला. तर करामुळेच बिअरच्या खरेदीत वाढ झाल्याचे दिसून आले आहे.
सद्यस्थितीत लॉकडाऊनमुळे व्यावसायिकांना आव्हानांना तोंड द्यावे लागत आहे. अशा स्थितीत या करामुळे फायदा होण्याऐवजी नुकसानच अधिक होईल असे मार्लो यांनी सांगितले. आम्ही या कराला आमचा विरोध जाहीर करत राहू असे त्यांनी स्पष्ट केले.
चीनीमंडी चे अपडेट्स व्हाट्सअप वर मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
WhatsApp Group Link