कोईमतूर : देशातील गाळप हंगाम जवळपास संपुष्टात आला आहे. देशातील प्रमुख साखर उत्पादक राज्यातील साखर कारखान्यांनी गाळप बंद केले आहे. आता फक्त तामीळनाडूतील काही कारखान्यांचे गाळप सुरू आहे. चालू हंगामात तामीळनाडूतील कारखान्यांनी गेल्या हंगामाच्या तुलनेत अधिक साखर उत्पादन केले आहे.
इंडियन शुगर मिल्स असोसिएशनच्या (इस्मा) ताज्या अहवालानुसार, तामीळनाडूमध्ये चालू हंगामात सुरू झालेल्या २८ कारखान्यांपैकी ३ अद्याप सुरू आहेत. १५ जून २०२१ अखेर राज्यात साखर उत्पादन ६.७०लाख टन झाले. तर गेल्यावर्षी याच कालावधीत ६.१२ लाख टन साखर उत्पादन झाले होते. गेल्यावर्षी १५ जून २०२० पर्यंत २४ साखर कारखान्यांपैकी ४ सुरू होते. गेल्यावर्षी जून-सप्टेंबर या कालावधीत खास हंगामात तामीळनाडूतील कारखान्यांनी २.० लाख टन साखरेचे उत्पादन केले होते.
उत्तर प्रदेश, महाराष्ट्र आणि कर्नाटकातील साखर हंगाम जवळपास संपुष्टात आला आहे. देशातील साखर कारखान्यांनी १ ऑक्टोबर २०२० पासून १५ जून २०२१पर्यंत ३०६.६५ लाख टन साखरेचे उत्पादन केले आहे. गेल्या हंगामात उत्पादीत करण्यात आलेल्या २७१.११ लाख टनापेक्षा हे उत्पादन ३५.५४ लाख टन अधिक आहे. देशात सध्या केवळ पाच साखर कारखान्यांचे गाळप सुरू आहे.
चीनीमंडी चे अपडेट्स व्हाट्सअप वर मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
WhatsApp Group Link