तीन दशकांपासून बंद साखर कारखाना सुरू करण्याची मागणी

पूर्णिया : परिसरातील शेतकरी नकदी पिक असलेल्या ऊसाची शेती करून आनंदीत होते. साखर कारखान्यामुळे इतरांनाही रोजगार मिळत होता. मात्र, कारखाना बंद झाल्याने शेती आणि शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. आणि साखर कारखाना सुरू करू हे फक्त निवडणुकीतील आश्वासन उरले आहे. बनमनखी येथील शेतकऱ्यांची ही अवस्था गेल्या तीन दशकांपासून आहे.

आता सामाजिक कार्यकर्ते प्रभात यादव यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन सुरू झाले आहे. साखर कारखाना परिसरात सरकारविरोधात घोषणाबाजी करण्यात आली आणि कारखाना लवकरात लवकर सुरू करण्याची मागणी करण्यात आली. यावेळी प्रभात यादव म्हणाले, बनमनखी साखर कारखाना बंद झाल्याने हजारो लोक बेरोजगार झाले. उसावर अवलंबून असलेली शेती उद्ध्वस्त झाली. १९६७ मध्ये कारखाना सुरू करण्यात आला. मात्र, सरकारी उदासिनतेमुळे तो बंद पडला. गेल्या तीस वर्षांपासून कारखाना बंद आहे. आता कारखाना सुरू होण्याची सर्वांना प्रतीक्षा आहे. शेतीबरोबरच परिसरातील व्यापाराला गती येऊ शकेल. प्रत्येकवेळी निवडणुकीत हा मुद्दा चर्चेला येतो आणि नंतर काहीच होत नाही.

उपलब्ध माहितीनुसार, साखर कारखान्याची ११९ एकर जमीन सरकारने वियाडाला हस्तांतरीत केली आहे. प्रभात यादव यांनी सांगितले की, जर कारखाना सुरू केला नाही तर हजारो शेतकरी बेमुदत उपोषण, जन आंदोलन करतील. यावेळी सामाजिक कार्यकर्ते संजीत कुमार यादव, सोनू यादव, दीपक यादव, मुकेश स्वर्णकार, रमेश स्वर्णकार आदी उपस्थित होते.
चीनीमंडी चे अपडेट्स व्हाट्सअप वर मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
WhatsApp Group Link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here