सुवा : व्होडाफोन फिजीचे प्रादेशिक मुख्य कार्यकारी अधिकारी प्रदीप लाल यांची फिजी शुगर कॉर्पोरेशनच्या (एफएससी) अध्यक्षपदी निव करण्यात आली आहे. ते कॅनडास्थिती विष्णू मोहन यांच्या ठिकाणी असतील.
‘एफएससी’चे मुख्य कार्यकारी अधिकारी भान सिंह आणि कंपनी व्यवस्थापकांनी लाल यांचे नव्या नियुक्तीबाबत अभिनंदन केले. एफएससीने म्हटले आहे की, व्यवस्थापन खूप आनंदी आहे. संघटनेत एका नव्या नेतृत्वाखाली काम करण्यास टीम खूप उत्सुकत आहे. श्री लाल हे गेल्या दोन दशकांपासून व्होडाफोनशी जोडले गेले आहेत. सध्या ते व्होडाफोन ग्रुप ऑफ कंपनीजचे प्रादेशिक मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत. त्यांनी व्होडाफोन ग्रुप ऑफ कंपनीजला अनेक योजनांमध्ये यश मिळवून दिले आहे. फिजी आणि परिसरातील व्यावसायाच्या वाढीसह उत्पादनातील नाविन्य आणि व्यवसायातील वैविध्य या गोष्टींसाठी त्यांनी प्रयत्न केले.
चीनीमंडी चे अपडेट्स व्हाट्सअप वर मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
WhatsApp Group Link