नवी दिल्ली : भारतातील दिग्गज उद्योगपती गौतम अदानींनी आशियातील दुसऱ्या सर्वात श्रीमंत व्यक्तीचा किताब गमावला आहे. या आठवड्यात शेअर बाजारातील घसरणीचा सामना करणाऱ्या अदानी समुहाचे अध्यक्ष गौतम अदानी मे महिन्यात आशियातील दुसऱ्या क्रमांकाचे अब्जाधिश बनले होते. मात्र, फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर्सच्या चिंतेमुळे अदानींन गेल्या ४ दिवसांत १२ अब्ज डॉलरचे नुकसान सोसावे लागले आहे.
फोर्ब्सच्या रिअल टाइम बिलिनिअर्स इंडेक्सनुसार, या आठवड्याच्या सुरुवातीला अदानी यांची एकूण संपत्ती ७४.९ बिलियन डॉलरवरुन घसरून ६२.७ बिलियन डॉलर झाली. रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी यांच्यानंतर चीनच्या फार्मास्युटिकल मॅग्नेट झोंग शानशान यांनी आशियातील दुसऱ्या सर्वात श्रीमंत व्यक्तीचे आपले स्थान पु्न्हा पटकावले आहे.
श्रीमंतांच्या यादीत झोंग शानशान यांची संपत्ती ६८.९ अब्ज डॉलर आहे तर अंबानी यांची संपत्ती ८५.६ अब्ज डॉलर आहे. अदानी एंटरप्रायजेस, अदानी पॉवर, अदानी टोटल गॅस, अदानी ट्रान्समिशन, अदानी पोर्टस, अदानी ग्रीन एनर्जीचे शेअर्स सोमवारपासून घसरले.
फोर्ब्स रिअल टाइम बिलिनिअर्स यादीनुसार अदानी यांना ४ दिवसांच्या कामकाजात १२ बिलियन डॉलरचे नुकसान झाले. आठवड्याच्या सुरुवातीला अदानी यांची एकूण संपत्ती ७७ अब्ज डॉलर होती. मे महिन्यात ब्लूमबर्ग बिलिनिअर्स इंडेक्सने दिलेल्या माहितीनुसार चीनच्या झोंग शानशान यांना पिछाडीवर टाकून अदानी यांनी हे स्थान पटकावले होते. अदानी समुहाच्या कंपन्यांचे शेअर्स गेल्या काही महिन्यात गतीने वाढले. त्यामुळे गौतम अदानी यांचे स्थान भक्कम झाले. ब्लूमबर्गच्या यादीत ते १४ व्या स्थानी पोहोचले तर आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी हे या यादीत १३ व्या क्रमांकावर होते.
ब्लूमबर्ग बिलिनिअर्स इंडेक्सनुसार, मे महिन्यात अदानी यांची एकूण संपत्ती ६.५ बिलियन डॉलरवर पोहोचली. यावर्षी अदानी यांच्या संपत्तीत ३२.७ डॉलरचा फायदा झाला. तर अंबानी यांची संपत्ती ७६.५ बिलियन डॉलरवर गेली. तर शानशान यांची एकूण संपत्ती ६३.६ बिलियन डॉलर असल्याची नोंद झाली होती.
चीनीमंडी चे अपडेट्स व्हाट्सअप वर मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
WhatsApp Group Link