बँकॉक : सन २०२१-२२ या वर्षीच्या दुष्काळामुळे ऊसाचे उत्पादन घटण्याची शक्यता आहे. आणि साखर कारखान्यांमध्ये ऊसाची खरेदी करण्यासाठी प्रतिस्पर्ध्यांकडून चांगल्या दरांची घोषणा केली जाण्याची अपेक्षा आहे. कमी ऊस उत्पादन, साखर उत्पादन आणि निर्यातीवर याचा परिणाम होण्याची शक्यता आहे.
थायी शुगर मिलर्स कॉर्पोरेशनचे (सीएसएमसी) महासंचालक रंगसिट हियांग्राट यांनी सांगितले की, थालयंडमध्ये या वर्षी कमी पाऊस झाला आहे. त्यामुळे नव्या वर्षात ऊस पिकाचे उत्पादन ७०-७५ मिलियन टन होईल अशी शक्यता आहे गळीत हंगामा २०२०-२१ या कालावधीत थायलंडचे ऊस उत्पादन ८.२० मिलियन टनावरुन घटून ६६.७ मिलियन टन झाले. यापूर्वी २०१९-२० या काळात ते ७४.९ मिलियन टन होते. साखर कारखआन्यांकडून यावर्षी, २०२१-२२ या हंगामात ७ मिलियन टन कमी साखरेचे उत्पादन होईल असा अंदाज टीएसएमसीचा आहे. २०१७-१८ मध्ये उच्चांकी १४.७ मिलियन टन उत्पादन झाले होते.
नॅशनल फेडरेशन ऑफ शुगर प्लॉटर्स असोसिएशनचे प्रमुख नरथिप अनंतसुक यांनी सांगितले की, थालयंड आणि इतर ऊस उत्पादक देश दुष्काळाचा सामना करीत आहेत. त्यामुळे थालयंडच्या काही साखर कारखान्यांनी २०२१-२२ या कालावधीत शेतकऱ्यांकडून १,३०० बाट् प्रती टन या दराने ऊस खरेदी केला जाईल. या दर आधीच्या दरापेक्षा ३०० बाट् अधिक आहे. सर्व साखर कारखान्यांना उपलब्ध ऊस पुरेसा ठरणार नसल्याने त्यांना स्पर्धेला सामोरे जावे लागत आहे.
चीनीमंडी चे अपडेट्स व्हाट्सअप वर मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
WhatsApp Group Link