शामली, उत्तर प्रदेश: साखर कारखान्यांकडून उसाचे पैसे वेळेवर मिळाले नसले तरी जिल्ह्यातील शेतकरी ऊस शेतीपासून दूर गेलेले नाहीत. जिल्ह्यातील साखर कारखान्यांकडे २०२०-२१ या गळीत हंगामातील ७३६ कोटी ६९ लाख रुपयांची थकबाकी आहे. तरीही यावर्षी २०२१-२२ या कालावधीत ऊसाचे लावण क्षेत्र २.३४ टक्क्यांनी वाढले आहे.
गेल्या वर्षी, जिल्ह्यात उच्चांकी ऊस उत्पादन झाले. ऊस विभागाकडील आकडेवारीनुसार जिल्ह्यातील उसाचे क्षेत्रफळ ८० हजार २०० हेक्टर होते. जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी ३५५.१४ लाख क्विंटल ऊस ११४२ कोटी ९६ लाख रुपये देऊन खरेदी केला. जिल्ह्यातील सर्व साखर कारखान्यांनी ४०६ कोटी २८ लाख रुपायांसह शेतकऱ्यांना ३५.५५ टक्के पैसे दिले आहेत. जिल्ह्यातील सर्व साखर कारखान्यांचा गाळप हंगाम संपला असून शामली, ऊन, थानाभवन कारखान्यांकडे ही उच्चांकी ७३६ कोटी ६९ लाख रुपयांची थकबाकी आहे.
गेल्या हंगामात शामली कारखान्यावर २३५ कोटी ४६ लाख रुपये, ऊन कारखान्यावर १७८ कोटी ७१ लाख तर थानाभवन कारखान्यावर ३२२ कोटी ६१ लाख रुपयांची थकबाकी आहे. तरीही २.३४ टक्के ऊस लागण क्षेत्र वाढले आहे. जिल्हा ऊस अधिकारी विजय बहादूर सिंह यांनी ही माहिती दिली.
चीनीमंडी चे अपडेट्स व्हाट्सअप वर मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
WhatsApp Group Link