नवी दिल्ली: कोरोना महामारीच्या दुसऱ्या लाटेतून दिलासा मिळाल्यानंतर आता उद्योग जगताला प्रशिक्षित कामगारांचा शोध घेणे मुश्किल बनले आहे. महाराष्ट्र, दिल्लीसह अनेक औद्योगिक राज्यांनी एप्रिलपासून मे पर्यंत लागू केलेल्या लॉकडाऊननंतर कुशल आणि अकुशल कामगार आपापल्या गावाला पळून गेले. लॉकडाऊन संपल्यानंतर अनेक कामगार परत आलेले नाहीत. त्यामुळे कंपन्यांच्या उत्पादनावर परिणाम होत आहे.
कापड उत्पादक टीटी लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक आणि भारतीय कापड उद्योग महासंघाचे (सीआयटीआय) अध्यक्ष संजय जैन यांनी सांगितले की, कुशल कामागारांअभावी उत्पादनावर विपरित परिणाम झाला आहे. कामगार नसल्याने उत्पादन घटले आहे. त्यामुळे कंपन्यांना नुकसानीला सामोरे जावे लागत आहे. सणासुदीला टेक्स्टाइल उद्योगाला आणखी नुकसानीला सामोरे जावे लागेल अशी भीती त्यांनी व्यक्त केली.
चेंबर ऑफ इंडिस्ट्री ऑफ उद्योग विहारचे अध्यक्ष अशोक कोहली यांनी सांगितले की, कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता असल्याने कुशल कामगार गावाकडून पुन्हा शहरात येण्यास घाबरत आहेत. जर लसीकरणाला गती मिळाली तर आणि तिसऱ्या लाटेला रोखण्यात यश आले नाही तर कंपन्यांना आणखी नुकसानीला सामोरे जावे लागेल. कुशल कामगारांअभावी एसएमई, मॅन्युफॅक्चरिंग, ऑटो, रिअल इस्टेट, मायनिंग आदींचे खूप नुकसान होत आहे. दरम्यान, अंतरिक्ष इंडिया ग्रुपचे सीएमडी राकेश यातदव यांनी सांगितले की, कुशल, अकुशल कामगारांअभावी बांधकामांना मोठा फटका बसला आहे. त्यामुळे दिलेल्या मुदतीत बांधकाम पूर्ण करून घरे देणे अतिशय अवघड बनले आहे. तर गेल्यावर्षीच्या तुलनेच स्थिती थोडी बरी असल्याचे जनरल इंडिया एसएमई फोरमचे सेक्रेटरी सुषमा मोरथनिया यांनी सांगितले.
चीनीमंडी चे अपडेट्स व्हाट्सअप वर मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
WhatsApp Group Link