गोपालगंज : यंदा वेळेआधी आलेल्या मान्सूनमुळे गंडक नदीला आलेल्या पुराने ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. नदीकिनाऱ्यावरील तसेच आतील बाजूचा २२ हजार हेक्टरमधील ऊस पुराच्या पाण्यात बुडाला आहे. सुमारे सात दिवसांपर्यंत या शेतांमध्ये पाणी साठून राहिले. आता पाऊस थांबल्यानंतर ऊन्ह पडल्यानंतर उसाची रोपो वाळू लागली आहेत. आपल्या पिकाची दुर्दशा पाहून शेतकऱ्यांचा आक्रोश वाढला आहे. पुरामुळे पन्नास टक्क्यांहून अधिक शेती उद्ध्वस्त झाली आहे.
पुरामुळे सुमारे ३० कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. जून महिन्यातच पुरामुळे ऊसाचे पिक नष्ट झाल्याने साखर कारखान्यांसमोरही संकट आहे. गेल्या दशकभरापासून ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये नदीला पूर येतो. त्यावेळी ऊसाची वाढ झालेली असते. मात्र, आता तीन फुटांपेक्षा कमी ऊस असताना आलेल्या पुरामुळे रोपे कुजली आहेत. आता उरलेली रोपेही वाळून नष्ट होतील.
बतरदेह येथील भटकूल यादव यांनी सांगितले की, त्यांचा २७ एकरातील ऊस पुरात बुडाला आहे. राधेश्याम भगत, सुभाष यादव, संजय बनवार आदी शेतकऱ्यांच्या ऊसातही पावसाचे पाणी घुसले आहे. मंझरिया येथील हरेंद्र यादव, मुंगराहा येथील अनिल यादव यांनी सांगितले की, त्यांचा ऊसही पुरामुळे नष्ट झाला. यंदा चांगल्या पावसाने ऊसाचे चांगले उत्पादन होईल अशी शक्यता होती. मात्र, जोरदार पाऊस आणि वाल्मिकी नगर धरणातून साडलेल्या ४ लाख १२ हजार क्सुसेक पाण्यामुळे सर्वकाही संपले आहे असे शेतकऱ्यांनी सांगितले. खरेतर गोपालगंज जिल्ह्यातील दियारा क्षेत्र ऊस उत्पादनात अव्वल मानला जातो. १६ जून अखेर ३० हजार १९८ एकर ऊस क्षेत्र आहे. ३५ हजार शेतकरी दियारामध्ये आहेत. त्यांच्याकडे २२ हजार हेक्टर जमिनीवर ऊस शेती आहे. त्यातील बहुतांश शेतांना फटका बसला आहे. गेल्यावर्षीही ५० कोटी रुपयांचे नुकसान शेतकऱ्यांना सहन करावे लागले होते.
चीनीमंडी चे अपडेट्स व्हाट्सअप वर मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
WhatsApp Group Link