नवी दिल्ली : पेट्रोल आणि डिझेलच्या दरात आज झालेल्या वाढीनंतर मुंबईत पेट्रोल १०४ रुपये, चेन्नईत ९९ रुपये आणि दिल्लीत प्रती लिटर ९८ रुपयांवर पोहोचले. मुंबईत डिझेलही ९६ रुपये प्रति लिटरवर पोहोचले. तेल कंपन्यांनी शनिवारी देशातील चार बड्या महानगरातील पेट्रोलचे दर ३५ पैसे तर डिझेलचे दर ३७ पैशांनी वाढवले. यापूर्वी शुक्रवारी दर स्थिर ठेवण्यात आले होते.
इंडियन अॉइल कॉर्पोरेशनने दिलेल्या माहितीनुसार, आज दिल्लीत पेट्रोल आणि डिझेल ३५-३५ पैशांनी महागले. या वाढीनंतर पेट्रोल ९८.११ रुपये आणि डिझेल ८८.६५ प्रती लिटरच्या उच्चांकावर पोहोचले. दिल्लीत जूनपासून आतापर्यंत पेट्रोल ३.८८ रुपये आणि डिझेल ३.५० रुपयांनी वाढले आहे. यापूर्वी मे महिन्यात पेट्रोल ३.८३ तर डिझेल ४.४२ पैशांनी महागले आहे.
चीनीमंडी चे अपडेट्स व्हाट्सअप वर मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
WhatsApp Group Link