मोहम्मदी-खीरी : शाहजहांपूरच्या उत्तर प्रदेश ऊस संशोधन संस्थेच्यावतीने सहीजना गावात कृषी वैज्ञानिकांनी शेतकऱ्यांना मौलिक मार्गदर्शन केले. अजवापूर साखर कारखाना आणि ऊस विकास परिषदेने या शेतकरी मेळाव्याचे आयोजन केले होते.
बैठकीत सहाय्यक संचालक पी. के. कपिल यांनी ऊसात मर्यादित खतांच्या प्रमाणाबाबत शेतकऱ्यांशी चर्चा केली. जुलैच्या पहिल्या आठवड्यात नत्रयुक्त खतांचा वापर करावा असा सल्ला त्यांनी दिला. जैविक खते अधिकाधिक वापरावीत असे ते म्हणाले. जर शेतकऱ्यांनी ऊसाची रोपे तयार केली तर त्यापासून उसाचे उत्पादन चांगले मिळते असे ते म्हणाले. एस. के. पाठक यांनी शेतकऱ्यांना उसावरील लाल सड रोगाबाबत आणि त्यावरील उपाययोजनांची माहिती दिली. साखर कारखान्याच्यावतीने सुरू असलेल्या माहितींबाबतही त्यांनी शेतकऱ्यांना सांगितले. यावेळी ऊस विकास निरीक्षक अनिल सिंह, राजेश सिंह, विभागाचे अधिकारी बृजेश सिंह, हरिनारायण आदींनी शेतकऱ्यांना विविध विषयांवर मार्गदर्शन केले.
चीनीमंडी चे अपडेट्स व्हाट्सअप वर मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
WhatsApp Group Link