गोला गोकर्णनाथ खीरी, उत्तर प्रदेश: विविध प्रलंबीत मागण्यांच्या पूर्ततेसाठी ऊस कामगार संघटना, भारतीय साखर कारखाना कामगार संघ आणि साखर कामगार युनियन या तिघांच्या संयुक्त विद्यमाने साखर कारखान्याच्या प्रवेशद्वारावर धरणे आंदोलन करण्यात आले. जर मागण्या पूर्ण झाल्या नाही तर तिव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला.
स्थानिक साखर कारखान्याची कामगार संघटना, ऊस कामगार युनियन, भारतीय साखर कारखाना कामगार संघ आणि साखर कामगार युनियनचे कार्यकर्ते कारखान्याच्या मुख्य गेटवर एकत्र आले. पगाराची फेररचना केली जावी, विज, पाण्याची सोय करावी, कर्मचाऱ्यांना क्वार्टर्स देताना त्यामध्ये पारदर्शकता असावी तसेच कॉलन्यांमधील रस्त्यांची दुरुस्ती करावी अशी मागणी करण्यात आली. या मागण्यांबाबत कामगार संघटनांनी जोरदार आंदोलन केले. मागण्या मान्य न केल्या तिव्र आंदोलन करू असा इशारा देण्यात आला.
यावेळी हरिशंकर कश्यप, शैलेंद्र शाह, गिरजा शंकर, राजकुमार अवस्थी, सुरेशचंद्र शर्मा, झाकिर अली आदींसह कामगार नेते, कामगार उपस्थित होते.
चीनीमंडी चे अपडेट्स व्हाट्सअप वर मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
WhatsApp Group Link