साओ पाउलो : ब्राझीलची ऊर्जा क्षेत्रातील कंपनी रायझेन एसएने देशांमध्ये आपला दुसरा सेल्यूलोसिक इथेनॉल निर्मिती प्लांट सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. नव्या प्लांटची उत्पादन क्षमता ८२ मिलियन लिटर प्रति वर्ष असेल. सध्याच्या पेक्षा ही क्षमता दुप्पट आहे.
प्रसार माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, व्यावसायिक पद्धतीने दोन इथेनॉल निर्मिती प्रकल्प चालविणाऱ्या जगातील एकमेव कंपनी असलेल्या रायझेनने यासाठी केल्या जाणाऱ्या गुंतवणुकीबाबत फारशी माहिती दिलेली नाही. रायझेनच्या या निर्णयामुळे सेल्युलोसिक जैव इंधनाची वाढती मागणी पूर्ण होऊ शकते. रायझेनने सांगितले की, नव्या प्लांटमधील ९१ टक्के उत्पादनाची जागतिक ऊर्जा क्षेत्रातील दीर्घकालीन करारानुसार विक्री करण्यात आली आहे. कंपनीने सांगितले की, नवा प्लांट साओ पाउलो राज्यातील गुआरिबामधील बोनफिम बायोएनर्जी पार्कचा हिस्सा असेल. तेथे उसाच्या बायोमासपासून साखर, इथेनॉल आणि विजेचे उत्पादन होईल. शिवाय यात कंपनीचे पहिले बायोगॅस संयंत्र समाविष्ट आहे. त्याचे उद्घाटन ऑक्टोबर २०२० मध्ये करण्यात आले. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार नवा प्लांट २०२३ पर्यंत कामकाज सुरू करेल. त्यामुळे रायझेनची एकूण उत्पादन क्षमता १२० मिलियन लिटर प्रति वर्ष सेल्युलोसिक इथेनॉल पर्यंत वाढणार आहे.
चीनीमंडी चे अपडेट्स व्हाट्सअप वर मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
WhatsApp Group Link