कोलंबो : श्रीलंकेने इथेनॉलच्या आयातीवर निर्बंध लागू केल्याने सरकारकडून संचलितसाखर कारखान्यांना फायदा झाला आहे असे प्रतिपादन राष्ट्रपती गोटाबाया राजपक्षे यांनी केले. यापूर्वी हे साखर कारखाने तोट्यामध्ये चालत होते. आमचे साखर कारखाने आता नफ्यामध्ये आहेत. कारण, आम्ही इथेनॉलच्या आयातीवर पूर्णपणे निर्बंध लागू केले आहेत असे राजपक्षे म्हणाले.
अलिकडेच सरकारने सांगितले होते की, इथेनॉलची आयात करण्यास निर्बंध लागू केल्यानंतर लंका शुगर कंपनी प्रायव्हेट लिमिटेड ही आता नफा कमवित आहे. इथेनॉल आयातीवरील निर्बंध असल्यानेच लंका शुगर कंपनी सातत्याने असलेल्या तोट्यातून बाहेर पडल्याची माहिती सरकारच्यावतीने एका निवेदनातून देण्यात आली होती.
सरकारने सांगितले की, इथेनॉलच्या आयातीवरील निर्बंधाच्या निर्णयाचा स्थानिक साखर उद्योगाला एक मोठा दिलासा मिळाला आहे. साखर उद्योगासाठी इथेनॉल हे एक वरदान ठरेल असे सरकारचा दावा आहे.
चीनीमंडी चे अपडेट्स व्हाट्सअप वर मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
WhatsApp Group Link