नवी दिल्ली : इंधनाचे वाढते दर आणि वाढत्या महागाईविरोधात ऑल इंडिया मोटर ट्रान्स्पोर्ट काँग्रेस आणि दिल्ली गुड्स ट्रान्स्पोर्ट असोसिएशनने (डीजीटीए) सोमवारी दिल्लीतील गोखले मार्केटमध्ये सायकल रिक्षातून मालाची वाहतूक करून निदर्शने केली. डीजीटीएचे अध्यक्ष परमीत सिंह गोल्डी यांनी सांगितले की, डिझेल आणि पेट्रोलच्या वाढत्या दरामुळे वाहतूकदारांचे मोठे नुकसान होत आहे. देशातील २० कोटी लोक वाहतूक व्यवसायाशी निगडीत आहेत. जर अशीच स्थिती राहीली तर आम्हाला सायकल रिक्षानेच माल वाहतूक करावी लागेल. पेट्रोल आणि डिझेलचे दर नियंत्रणात आणावेत अशी आमची मागणी असल्याचे गोल्डी यांनी सांगितले.
गोल्डी यांनी सांगितले की, असोसिएशनने सरकारला एक निवेदन देण्याचा निर्णय घेतला आहे. जर सरकारने त्यांच्या मागण्या मान्य केल्या नाहीत तर लवकरच असोसिएशन आंदोलनाचा निर्णय घेईल. बेमुदत देशव्यापी आंदोलन करण्याची घोषणा करू.
वाहतूकदार प्रविण कुमार यांनी सांगितले की, सरकारने पेट्रोल आणि डिझएलच्या दरात सातत्याने वाढ केली आहे. ही वाढ अनियंत्रित आहे. कर्जासाठी सवलत योजनेची मुदत वाढवली गेली नाही. आता चक्रवाढ व्याज भरावे लागत आहे. अशा स्थितीत वाहतूकदार तोट्यात आहे. त्यामुळे वाहने चालवायची कशी असा प्रश्न आहे.
चीनीमंडी चे अपडेट्स व्हाट्सअप वर मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
WhatsApp Group Link