न्यूयार्क : ब्राझीलमध्ये खाद्य व्यापारी आणि प्रमुख वितरक जार्निकोव्हने स्पष्ट केले की, २०२१-२२ या कालावधीत दक्षिण क्षेत्रामध्ये साखर उत्पादनात ३५.६ मिलियन टनाच्या एप्रिल महिन्याच्या अंदाजात बदल करण्यात आला आहे. आता ३४.१ मिलियन टन साखर उत्पादन होईल असा अंदाज जार्नोकोव्हने व्यक्त केला. सातत्याने असलेल्या कोरड्या वातावारणामुळे ऊसाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असल्याचे कंपनीतर्फे सांगण्यात आले.
अहवालात दिलेल्या माहितीनुसार, ब्राझीलमधील साखर कारखानदार या हंगामात फक्त ५३५ मिलियन टन उसाचे गाळप करू शकतात. जार्नोकोव्हचा यापूर्वीचा अंदाज ५५८ मिलियन टन गाळपाचा होता. ऊसावर आधारित इथेनॉल उत्पादन गेल्या हंगामाच्या तुलनेत १२ टक्क्यांनी घसरून २४.४ बिलियन लिटर झाले आहे.
जार्निकोव्हने सांगितले की, जानेवारी आणि जूनदरम्यान ब्राझीलच्या दक्षिण विभागात पावसात साधारणतः ४३ टक्क्यांची घट झाली. जार्नोकोव्हने सांगितले की, कमी उत्पादनामुळे ब्राझील कच्च्या साखरेच्या निर्यातीत घट करण्याची शक्यता आहे.
चीनीमंडी चे अपडेट्स व्हाट्सअप वर मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
WhatsApp Group Link