शामली : थकीत ऊस बिलांपोटी शेतकऱ्यांनी जिल्हा ऊस अधिकाऱ्यांच्या कार्यालयासमोर आंदोलन केले. जिल्हा ऊस अधिकारी विजय बहादूर सिंह यांच्याकडे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या नावे असलेले निवेदन देऊन लवकरात लवकर व्याजासह ऊस बिले द्यावीत अशी मागणी केली.
युवा शेतकरी नेते राजन जावला यांनी सांगितले की, जिल्ह्यातील तीन साखर कारखान्यांकडे गाळप हंगाम २०२०-२१ मधील ७३० कोटी रुपयांची थकबाकी आहे. आतापर्यंत खूप कमी पैसे शेतकऱ्यांना मिळाले आहेत. सरकारने १४ दिवसांत ऊस बिले देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, साखर कारखान्यांच्या विरोधात कारवाई झालेली नाही. शेतकरी आर्थिक संकटात आहेत. त्यांना आजारपण, विवाह, शेती हंगामाची तयारी आणि इतर खर्चासाठी कर्ज घ्यावे लागत आहे. तातडीने व्याजासह पैसे द्यावेत आणि चौदा दिवसांत ऊस बिले न देणाऱ्या कारखान्यांवर कारवाई करावी अशी आमची मागणी आहे.
जिल्हा ऊस अधिकारी विजय बहादूर सिंह यांनी लवकरात लवकर पैसे देण्याची प्रक्रीया केली जाईल असे सांगितले. जिल्हाधिकारी जसजित कौर यांनी तिन्ही कारखान्यांच्या प्रशासनासोबत बैठक घेण्याचे आश्वासन दिले. यावेळी निशांत चौधरी, प्रांशू, लक्ष्य कुमार, विक्रांत, नावेद चौधरी, मयंक मित्तल, अजय सैनी, राहुल जांगिड, सौरभ गुर्जर, अनुज चौधरी आदी उपस्थित होते.
चीनीमंडी चे अपडेट्स व्हाट्सअप वर मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
WhatsApp Group Link