बुलंदशहर : विभागातील त्रिवेणी साखर कारखान्यात बुधवारी कोविड लसीकरणासाठी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. पहासू सामुदायिक आरोग्य केंद्राच्या सहकार्याने आयोजित लसीकरण शिबिराचा प्रारंभ कारखान्याचे मुख्य महा व्यवस्थापक नरेश पाल यांनी फित कापून केले. साखर कारखान्याच्या परिसरातील १८ ते ४० वयोगटातील लोकांचे लसीकरण करण्यात आले. आसवनी विभागाचे महा प्रबंधक प्रमोद कुमार, हॉस्पिटलचे अधिक्षक डॉ. मनोज कुमार, डॉ. बिजेंद्र चौहान, मुकेश गिरी, के. साजित, आशुतोष त्यागी, सज्जनपाल सिंह राणा, अरुण पवार, कपिल राजपूत आदींचे लसीकरण शिबिरासाठी सहकार्य लाभले.
चीनीमंडी चे अपडेट्स व्हाट्सअप वर मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
WhatsApp Group Link