गेल इंडिया करणार इथेनॉल युनिटमध्ये गुंतवणूक

नवी दिल्ली : गेल इंडिया (GAIL) लिमिटेडने नव ऊर्जा वाढीच्या क्षेत्रात अधिक दमदार पाऊल उचलले आहे. बायोगॅससह आता इथेनॉल प्लांट सुरू करण्यासाठी ५,००० कोटी रुपये गुतंवणूकीचा निर्णय घेण्यात आला आहे.

गेलचे अध्यक्ष आणि कार्यकारी संचालक मनोज जैन यांनी सांगितले की, ऊर्जेच्या स्वच्छ रुपासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. गेल आता पायाभूत सुविधांमध्ये पाईपलाईनवर काम करीत आहे. अक्षय ऊर्जेसाठी ४,००० कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. किमान दोन बायोगॅस सयंत्र आणि इथेनॉल प्लांट सुरू करण्यासाठी ८००-१००० कोटी रुपयांची गुंतवणूक केली जाईल.

जैन म्हणाले, आम्ही कार्बन उत्सर्जन आणि प्रदुषणात कपात करण्यासाठी सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दृष्टिकोनातून सुरू असलेल्या योजनांवर काम करीत आहोत. सौर ऊर्जा अथवा पवन ऊर्जेच्या माध्यमातून विजेचे उत्पादन अधिक चांगले ठरेल. बायोगॅसमध्ये घरगुती कचरा घेऊन घरांना स्वच्छ ईंधन पुरविण्याचाही प्रयत्न आहे. याशिवाय आम्ही इथेनॉल प्लांट सुरू करण्यासाठी प्रयत्नशील आहोत.

चीनीमंडी चे अपडेट्स व्हाट्सअप वर मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
WhatsApp Group Link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here