पेट्रोलमध्ये इथेनॉल मिश्रणाने प्रदूषणात घट, ऊस उत्पादकांचीही कमाई

जास : जमशेदपूरसह झारखंडच्या पेट्रोलम डेपोमध्ये १० टक्क्यांपर्यंत पेट्रोलमध्ये इथेनॉल मिश्रण केले जात आहे. हे उद्दीष्ट २०२३ पर्यंत २० टक्क्यांवर नेण्यात येणार असून त्यामुळे भारताच्या पेट्रोल आयातीत दरवर्षी ४ अब्ज डॉलरची बचत होणार आहे.

जमशेदपूर शहरातील आर्थिक तज्ज्ञ सीए रमेश गुप्ता यांनी सांगितले की, इथेनॉलला प्रोत्साहन मिळाल्याचा मोठा फायदा साखर कारखान्यांना होईल. कारखान्यांतून बाहेर पडणारे इथेनॉल वाया जात होते. आता पेट्रोलियम कंपन्या ते नाममात्र किमतीवर खरेदी करत आहेत. हा कारखान्यांचा उप पदार्थ आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना एमएसपीत वाढ मिळू शकेल.
पेट्रोलमध्ये इथेनॉल मिश्रणामुळे बिहारमध्ये बंद साखर कारखाने खुले होऊ लागले आहेत. ऊस शेतीतही वाढ झाली आहे. अशाच प्रकारे झारखंडमध्ये ऊस शेतीला प्रोत्साहन दिले जात आहे. गॅसोलीन मिश्रणाच्या २० टक्क्यांसह सरकारचे उद्दीष्ट पूर्ण करण्यासाठी कारखान्यांना सध्याची साठवणूक क्षमता ३०० कोटी लिटरहून अधिक करावी लागणार आहे. ही क्षमता तीनपट वाढू शकते. तर २०२५ पर्यंत २० टक्के इथेनॉल मिश्रण होणार आहे. यासाठी १० बिलियन लिटर इथेनॉलची गरज भासेल.

रसायन शास्त्राचे तज्ज्ञ डॉ. ए. व्ही. शास्त्री यांनी सांगितले की, इथेनॉलच्या ९९ टक्के शुद्धतेचा एक प्रकार अल्कोहोल आहे. त्याला पेट्रोलमध्ये मिश्रीत केले जात आहे. हा एक उपपदार्थ आहे. १०० किलो ऊसाच्या रसापासून ६० लिटर इथेनॉल मिळते. खराब धान्यापासूनही इथेनॉल उत्पादनाचे प्रयत्न आहेत. एकूणच शेतीला याचा फायदा होणार आहे.
चीनीमंडी चे अपडेट्स व्हाट्सअप वर मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
WhatsApp Group Link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here