शेतकऱ्यांना दिलासा; ऊसाची एफआरपी वाढविण्याची चर्चा सुरू

नवी दिल्ली : केंद्र सरकारने ऊसाचा योग्य आणि लाभदायी मूल्य (एफआरपी) वाढविण्याच्या प्रस्तावावर चर्चा सुरू केली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे.

प्रसार माध्यमातील वृत्तानुसार, ऑक्टोबर २०२१- सप्टेंबर २०२२ या गळीत हंगामाच्या वर्षासाठी एफआरपी वाढविण्याचा अंतिम निर्णय आर्थिक विषयांच्या मंत्रिमंडळाच्या समितीकडून (सीसीईए) घेतला जाईल. कृषी मूल्य आयोगाने याची शिफारस आधीच केली आहे. या विषयाशी संबंधीत मंत्रालयासमोर मांडले जाणार आहे. कृषी, आर्थ मंत्रालय, नीति आयोग आणि खाद्य तथा सार्वजनिक वितरण विभाग यांदरम्यान चर्चा होईल. त्यानंतर कॅबिनेटच्या मंजुरीला विषय पाठवला जाणार आहे. त्यानंतर दर जाहीर केले जातील.

यापूर्वी सरकारने ऊसाचा दर १० रुपयांनी वाढवून २८५ रुपये प्रती क्विंटल जाहीर केला होता. महाराष्ट्र आणि कर्नाटकमध्ये ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी २०२१-२२ मध्ये शेतीचा खर्च वाढल्याने एफआरपीच्या वाढीची मागणी केली होती.

चीनीमंडी चे अपडेट्स व्हाट्सअप वर मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
WhatsApp Group Link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here