बिजनौर : भारतीय किसान युनियन अंबावताच्या मासिक बैठकीत ऊस बिले अद्याप न मिळाल्याबाबत संतप्त प्रतिक्रिया व्यक्त झाल्या. याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन व्याजासह ऊस बिले देण्याची मागणी करण्यात आली.
ऊस समितीच्या परिसरात झालेल्या बैठकीत जिल्हाध्यक्ष शिव कुमार यांनी सांगितले की, साखर कारखान्यांकडून ऊस बिले न मिळाल्याने शेतकऱ्यांना आर्थिक अडचणींशी सामना करावा लागत आहे. शेतामध्ये युरीया टाकण्यासाठीही शेतकऱ्यांकडे पैसे नाहीत. याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात भाकियूने म्हटले आहे की, शेतकऱ्यांना व्याजासह ऊस बिले देण्यात यावीत. केंद्र सरकारने तिन्ही कृषी कायदे मागे घ्यावेत, वीज पुरवठा सुरळीत ठेवावा, जंगली जनावरांपासून पिकांचे संरक्षण करावे, खराब रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करावी अशी मागणी केली आहे. याशिवाय, सरकारने शेतकरी आयोगाची स्थापना करावी, खासगी शाळांच्या फीमध्ये पन्नास टक्क्यांची कपात करावी, साठ वर्षावरील शेतकरी आणि कामगारांना मासिक पाच हजार रुपये पेन्शन द्यावी अशी मागणी केली आहे. मागण्या मान्य न केल्यास आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.
यावेळी जिला उपाध्यक्ष हरवीर सैनी, परशुराम सिंह, उदयभान, जावेद अख्तर, राजपाल प्रधान, ओमवीर पहीलवान, रामरतन सिसौदिया, विनीत त्यागी, कृष्णवीर त्यागी, नीरज सिंह आदी उपस्थित होते.
चीनीमंडी चे अपडेट्स व्हाट्सअप वर मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
WhatsApp Group Link