डीएसएम ग्रुपच्या तीन साखर कारखान्यांच्या गाळप क्षमतेत वाढ

धामपूर : राज्यातील आठ साखर कारखान्यांच्या गाळप क्षमतेचे विस्तारीकरण केले जात आहे. यामध्ये डीएसएम ग्रुपच्या तीन कारखान्यांचा समावेश आहे. शेतकऱ्यांची गरज लक्षात घेऊन विस्तारीकरण केले जात असल्याचे ग्रुपचे मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप शर्मा यांनी सांगितले. क्षमता वाढीनंतर शेतकऱ्यांचा ऊस वेळेवर गाळपास येऊ शकेल. आणि लवकर उसाची तोडणी झाल्यानंतर रिकाम्या शेतांमध्ये शेतकरी इतर रब्बी पिके घेऊन फायदा कमवू शकतात असे त्यांनी सांगितले.
डीएसएम ग्रुपचे मुख्य कार्यकारी अधिकारी शर्मा म्हणाले, राज्यात आठ कारखान्यांच्या गाळप क्षमतेत वाढ केली जात आहे. यामध्ये डीएसएम ग्रुपच्या असमौली, मिरगंज आणि रजपुरा येथील कारखान्यांचा समावेश आहे. जिल्ह्यातील बुंदकी कारखान्याचाही यात समावेश आहे. इतर कारखान्यांमध्ये मैजापूर, निगोही, जवाहरपूर आणि फरीदपूर हे कारखाने आहेत. रजपुरा कारखान्याची गाळप क्षमता ८५ हजार क्विंटल होती. ती आता ९० हजार क्विंटल करण्यात येत आहे. असमौली कारखान्यांची गाळप क्षमता ९० हजार क्विंटलवरुन वाढवून एक लाख ५ हजार क्विंटल करण्यात आली आहे. तर मिरगंज कारखान्याच्या गाळप क्षमतेत वाढ करून ती ५० वरून ६० हजार क्विंटल प्रती दिन केली जात आहे.

बुंदकी कारखान्याचे उपाध्यक्ष के. पी. सिंह यांनी सांगितले की, त्यांच्या कारखान्याची गाळप क्षमता सध्या ६५ हजार क्विंटल होती. त्यामध्ये आता १० हजार क्विंटलची वाढ करून ती ७५ हजार क्विंटल करण्यात येत आहे. क्षमता वाढीनंतर अपेक्षीत ऊस तोडणीसाठी पावत्या दिल्या जातील. धामपूर कारखान्याचे ऊस विभागाचे सरव्यवस्थापक ओमवीर सिंह यांनी सांगितले की, धामपूर साखर कारखान्याची गाळप क्षमता एक लाख ४० हजार क्विंटल प्रती दिन आहे. कारखाना एक ते सव्वा लाख क्विंटल प्रती दिन या गतीने सुरू राहील यासाठी प्रयत्न केले जात आहेत.
चीनीमंडी चे अपडेट्स व्हाट्सअप वर मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
WhatsApp Group Link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here