मुंबई/लखनौ : द्वारिकेश शुगर इंडस्ट्रीज लिमिटेडने २३२ कोटी रुपयांच्या गुंतवणुकीसह उत्तर प्रदेशातील बरेलीमध्ये डिस्टिलरी प्लांट सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. आपल्या फरीदपूरमधील द्वारिकेश धाम युनिटमध्ये १७५ किलो लिटर प्रती दिन क्षमतेची डिस्टिलरी स्थापन करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
सद्यस्थितीत या युनिटची क्षमता १६२.५ किलो लिटर प्रती दिन आहे. गेल्या १५ ते १६ महिन्यांपासून ही क्षमता विस्तारासाठी प्रयत्न सुरू आहेत. या युनिटमधून केंद्र सरकारने निश्चित केलेल्या उद्दीष्टांनुसार इथेनॉल उत्पादन वाढीसाठी प्रयत्न केले जाणार आहेत. प्रस्तावित डिस्टिलरी ऊसाच्या गाळप हंगामादरम्यान उसाच्या रसाचा वापर करेल. इथेनॉलच्या सातत्यपूर्ण उत्पादनासाठी बिगर हंगाम काळात बी हेवी मोलॅसिस अथवा धान्याचा वापर केला जाणार आहे.
दरम्यान, भारतीय शेअर बाजारामध्ये शुक्रवारी सुरुवातीच्या टप्प्यात द्वारिकेश शुगर इंडस्ट्रिज लिमिटेडचे शेअर्स बीएसईवर ७७.१० रुपयांवर ट्रेड करीत होते.
चीनीमंडी चे अपडेट्स व्हाट्सअप वर मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
WhatsApp Group Link