कोलंबो : श्रीलंकेत साखरेच्या घाऊक दरात अभूतपूर्व वाढ पहायला मिळत आहे. घाऊक व्यापाऱ्यांनी फक्त १० दिवसांत साखरेच्या एक किलोच्या दरात २५ रुपयांची वाढ केली आहे. साखरेवर कर कमी असल्याने साखर आयातदारांनी ६,००,००० टन साखरेची आयात केली आहे.
साखरेच्या वाढत्या किंमतीमुळे देशातील सर्वसामान्य नागरिक हवालदिल आहेत. त्यांनी साखरेच्या किमती कमी करण्याची मागणी सरकारकडे केली आहे.
श्रीलंकन सरकारने गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात साखरेवरील कर कमी केला. त्यावेळी देसात ९०,००० मेट्रिक टन साखरेची आयात केली जात होती. साखरेवरील कर कमी करण्यासह सरकारने साखरेचा जीवनावश्यक वस्तूंच्या यादीत समाविष्ट केले. साखरेसाठी प्रती किलो किरकोळ विक्रीचा दर ८५ रुपये निश्चित करण्यात आले होते. त्यानंतर सरकारने २२ मे रोजी साखर आयात करण्यासाठी परवाने देण्यावर निर्बंध लागू केले.
चीनीमंडी चे अपडेट्स व्हाट्सअप वर मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
WhatsApp Group Link