नागपूर : देशात सध्या पेट्रोल, डिझेल आणि पेट्रोलियम उत्पादनांच्या आयातीवर ८ लाख कोटी रुपये खर्च केले जातात. हे एक मोठे आव्हान आहे असे प्रतिपादन केंद्रीय रस्ते, वाहतूक तथा महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी केले. नागपुरमध्ये देशातील पहिल्या एलएनजी प्लांटचे उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.
गडकरी यांनी ऊर्जा, विज क्षेत्रासाठी कृषी क्षेत्राचा वैविध्यपूर्ण वापर आणि पर्यायी जैव इंधनाच्या मुद्यावर जोर दिला. ते म्हणाले, केंद्र सरकारने इथेनॉलसाठी जे धोरण निश्चित केले आहे, त्यातून पेट्रोलियम उत्पादनांच्या आयातीवरील आपले अवलंबित्त्व कमी होईल. याशिवाय, प्रदूषण मुक्ती, स्वदेशी इथेनॉल निर्मिती, जैव सीएनजी, एलएनजी, हायड्रोजन इंधन यांच्या निर्मितीसाठी प्रोत्साहन मिळेल.
मंत्री गडकरी म्हणाले, मंत्रालयाच्या स्तरावर बहुपर्यायी इंधनाच्या विषयावर काम सुरू आहे. आपल्याला तांदुळ, मक्का, साखर यांच्या नुकसानीपासून उपाय शोधता आला पाहिजे. यासाठी अतिरिक्त साठ्याचा वापर व्हायला हवा. आगामी तीन महिन्यात फ्लेक्स इंधनाबाबत निर्णय घेतला जाणार आहे. त्यामध्ये ऑटोमोबाईल निर्मात्यांना खास करून दुचाकी, चारचाकी वाहनांसाठी फ्लेक्स इंजिन तयार करणे अनिवार्य केले जाईल असे गडकरी म्हणाले.
यूएसए, कॅनडा, ब्राझीलसारखे काही देश आधीच फ्लेक्स इंधन, इंजिन उत्पादन करीत असल्याचे गडकरी यांनी सांगितले. पेट्रोल असो अथवा फ्लेक्स इंधन, वाहनाची किंमत तशीच राहाते असे ते म्हणाले.
चीनीमंडी चे अपडेट्स व्हाट्सअप वर मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
WhatsApp Group Link