नवी दिल्ली : केंद्र सरकारने २०२१-२२ या कालावधीत द्विपक्षीय व्यापार कराराअंतर्गत मालदीवला साखर, बटाटे, कांद्यासह काही वस्तूंच्या निर्यातीस मंजुरी दिली आहे.
परराष्ट्र व्यवहार महासंचालनालयाने (डीजीएफटी) जारी केलेल्या अधिसूचनेत म्हटले आहे की, या निर्यातीला भविष्यातील कोणत्याही निर्बंधातून सूट असेल. २०२१-२२, २०२२-२३ आणि २०२३-२४ या कालावधीसाठी भारत आणि मालदीव यांच्यामध्ये झालेल्या द्विपक्षीय व्यापार करारानुसार मालदिवला बटाटा, कांदा, तांदूळ, गव्हाचे पीठ, साखर, डाळ, नदीतील वाळू, आणि अंडी या वस्तू निर्यात करण्यास मंजुरी दिली आहे. ही निर्यात कोणत्याही अटी विना असेल.
नदीतील वाळू आणि दगडसदृश्य वस्तूंच्या निर्यातीस संबंधित निर्यातदारांनी राज्य सरकारच्या नियुक्त समितीकडून पर्यावरण मंजुरी घ्यावी लागेल. आर्थिक वर्ष २०२१-२२, २०२२-२३ आणि २०२३-२४ या वर्षासाठी प्रत्येक वर्षी ६१,४२३.१७ मेट्रिक टन साखर निर्यात करण्यास मंजुरी मिळाली आहे.
चीनीमंडी चे अपडेट्स व्हाट्सअप वर मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
WhatsApp Group Link