महिना अखेरपर्यंत शेतकऱ्यांना ऊस बिले देण्याचे ऊस मंत्र्यांचे आदेश

पाटणा : बिहारचे ऊस उद्योग मंत्री प्रमोद कुमार यांनी संबंधित अधिकाऱ्यांना २०२०-२१ या गळीत हंगामातील ऊस बिले ३० जुलैपर्यंत शेतकऱ्यांना दिली जावीत यासाठी प्रयत्न करण्याचे आदेश दिले आहेत.

वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत आयोजित एका ऑनलाईन आढावा बैठकीत, ऊस उद्योग विभागाचे सचिव एन.सर्वणा कुमार यांनी मंत्र्यांना सांगितले की, हरिनगर, लौरिया, सुगौली, नरकटियागंज या कारखान्याच्या अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांना १०० टक्के ऊस बिले देण्यास मंजुरी दिली आहे.

मंत्री प्रमोक कुमार नेमिल यांनी अधिकाऱ्यांना लवकरात लवकर सर्व्हे पूर्ण करण्याचे आदेश दिले आहेत. यासोबत त्यांनी ऊस विभागाच्या अधिकाऱ्यांना विभागात ऊसाचे पुरामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्यास सांगितले आहे. सवर्णा कुमार यांनी साखर कारखान्याच्या व्यवस्थापकांना संबंधित जिल्हाधिकारी आणि जिल्हा कृषी अधिकाऱ्यांशी चर्चा करून विभागाला नुकसानीचा अहवाल तातडीने देण्याचे आदेश दिले आहेत.
चीनीमंडी चे अपडेट्स व्हाट्सअप वर मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
WhatsApp Group Link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here