रायपूर, छत्तीसगड : छत्तीसगड सरकारने मक्का आणि इथेनॉल उत्पादनांचे प्लांट सुरू करण्यासाठी गुंतवणुकीला गती देण्याचा निर्णय घेतला आहे. राज्य सरकारने ग्लोबल इन्व्हेस्टर्स मिटमध्ये १५८ एमओयू रद्द केले. या संबंधीतांनी प्रक्रिया सुरू केली नव्हती. यामध्ये २००१ ते २०१८ या कालावधीतील ५५ एमओयूचा समावेश आहे. त्यावेळी भाजप सरकार सत्तेवर होते. मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी गुरुवारी २०१२ मध्ये ग्लोबल इन्व्हेस्टर्स मिटसह राज्यात उद्योग सुरू करण्याच्या अनेक कंपन्यांच्या निष्क्रीय ५५ एमओयू रद्द केल्याचे सांगितले.
बैठकीत मुख्यमंत्री बघेल यांनी राज्यात मक्का आणि ऊसापासून इथेनॉल उत्पादनासाठी प्लांट सुरू करण्यासाठी गुंतवणूकदारंच्या प्रस्तावांची तपासणी करणे आणि त्याला गतीने मंजूरी देण्याबाबतही निर्देश दिले.
केंद्र सरकारने देशात इथेनॉल उत्पादनासाठी प्रोत्साहन धोरण निश्चित केल्यानंतर या उद्योगासाठीची गुंतवणूक वाढली आहे. महाराष्ट्र, कर्नाटक, बिहार, उत्तर प्रदेशसह इतर राज्यांनी इथेनॉल धोरणासाठी उत्साह दर्शविला आहे.
चीनीमंडी चे अपडेट्स व्हाट्सअप वर मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
WhatsApp Group Link