अमरोहा : भारतीय किसान युनियनने थकीत ऊस बिलांबाबत २८ जुलै रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर आंदोलन करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. साखर कारखान्यांकडे गेल्या गळीत हंगामातील कोट्यवधी रुपयांची थकबाकी आहे. शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती अतिशय खराब आहे. तर साखर कारखानदार सुस्त आहेत. त्यामुळे आंदोलन करण्याचा निर्णय रविवारी शेतकरी भवनात झालेल्या पंचायतीमध्ये घेण्यात आला. पंचायतीमध्ये कृषी कायद्यांबाबत सुरू असलेल्या आंदोलनात आगामी १४ ऑगस्ट रोजी ट्रॅक्टर रॅली घेऊन जाण्याचा निर्णय झाला.
भाकियूचे राष्ट्रीय उपाध्यक्ष चौधरी विजयपाल सिंह यांनी सांगितले की, साखर कारखान्यांकडे शेतकऱ्यांचे कोट्यवधी रुपये थकीत आहेत. साखर कारखानदार पैसे देण्यास तयार नाहीत. त्यामुळे या प्रश्नी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोठे आंदोलन केले जाईल. केंद्र सरकारने कृषी कायद्यांबाबत घेतलेल्या भूमिकेबाबत त्यांचा निषेध करण्यात आला. आगामी १४ ऑगस्ट रोजी जिल्ह्यातून शेतकरी मोठ्या संख्येने दिल्लीच्या सीमेवर आंदोलनासाठी रवाना होतील असे ठरले.
पंचायतीमध्ये वीज विभागातील कथीत भ्रष्टाचाराबाबत शेतकऱ्यांनी तक्रारी मांडल्या. जर भ्रष्टाचार थांबविण्यात आला नाही, तर आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला. यावेळी रामपाल सिंह, चंद्रपाल सिंह, दानवीर सिंह, भगवान सिंह, सुभाष चीमा, अशोक सिंह, सौवीर सिंह, आलोक कुमार, देवराज सिंह आदी उपस्थित होते.
चीनीमंडी चे अपडेट्स व्हाट्सअप वर मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
WhatsApp Group Link