कोरोना संकटानंतरही साखर उद्योगासमोर अडथळे कायम

कासगंज : कोरोनाच्या काळात फटका बसलेले इतर उद्योग हळूहळू रुळावर येत आहेत. मात्र, साखर उद्योग अद्यापही रुळावर आलेला नाही. कोरोनाच्या काळात सुरुवातीच्या टप्प्यात परिणाम झालेल्या या उद्योगांतील व्यावसायिकांमध्ये चिंता दिसून येत आहे. न्यौली कारखान्याला अपेक्षित साखर विक्री होत नाही अशी स्थिती आहे. त्यामुळे साखर कारखान्यांना शेतकऱ्यांचे पैसे देण्यास उशीर होत आहे.

जिल्ह्यातील साखर उत्पादन युनीट न्यौली साखर कारखान्याने या गळीत हंगामात मागणीनुसार साखर उत्पादन केले आहे. मात्र, साखरेची मागणी अपेक्षित पद्धतीने नाही. कोरोनाच्या संक्रमण काळात कर्फ्यू लागू झाल्याने विवाह समारंभासह विविध इतर समांरभ अतिशय छोट्या स्तरावर करण्यात आले. आता चातुर्मास सुरू झाल्याने विवाह समारंभ थंडावले आहेत. अशा स्थितीत साखरेची मागणी सातत्याने कमी होत आहे. न्यौली साखर कारखान्याच्या साखरेचा सर्वाधिक खप आग्रा येथील पेठा उद्योगात होतो. मात्र, आग्र्याच्या पेठ्यावर विपरित परिणाम झाला आहे. त्यामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांना थकबाकी मिळणे अवघड झाला आहे. कारखान्याने या हंगामात १.८५ लाख क्विंटल साखर उत्पादन केले. सरासरी १० हजार क्विंटल साखरेची कारखान्याकडून विक्री केली जाते. मात्र, गेल्या चार महिन्यात फक्त ३ हजार क्विंटल साखरेची विक्री झाली आहे. घाऊक व्यापाऱ्यांकडून मागणी कमी झाली आहे. त्यामुळे न्यौली कारखान्याकडून अपेक्षित साखर विक्री होत नाही असे कारखान्यांच्या अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. त्यांना कोणत्याही परिस्थितीत शेतकऱ्यांची ऊस बिले अदा करण्यास सांगितले आहे असे जिल्हा ऊस अधिकारी ओम प्रकाश यादव यांनी सांगितले.
To receive ChiniMandi updates on WhatsApp, please click on the link below.
WhatsApp Group Link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here