बिजनौर : यंदा जिल्ह्यातील पाच साखर कारखान्यांनी उच्चांकी इथेनॉल उत्पादन केले आहे. जिल्ह्यात जवळपास ९६० लाख ४० हजार लिटर इथेनॉल निर्मिती झाली आहे. इथेनॉलच्या ५५ टक्के पैशांपासून शेतकऱ्यांच्या उसाची थकबाकी दिली जाते. इथेनॉल तयार केल्याने साखरेचे उत्पादन घटले आहे. इथेनॉल निर्मिती केली नसती तर साखर उत्पादन अधिक वाढले असते. जिल्ह्यातील पाच कारखान्यांनी आतापर्यंत ५०४ कोटी ७२ लाख रुपयांची इथेनॉल विक्री केली आहे.
जिल्ह्यातील पाच कारखान्यांनी ९६० लाख ४० हजार लिटर इथेनॉलचे उत्पादन केले. त्यापैकी ८८६ लाख ९४ हजार लिटर इथेनॉलची विक्री झाली आहे. इथेनॉल बनवून कारखाने शेतकऱ्यांची उर्वरीत ऊस बिले देत आहेत. इथेनॉल विक्रीतील ५५ टक्के पैसे यााठी वापरले जातात. कारखान्यांनी आतापर्यंत ५०४ कोटी ७२ लाख रुपयांचे इथेनॉल विक्री केले आहे. जिल्ह्यात साखर कारखाने बी हेवी, सी हेवी आणि मोलॅसीसपासून इथेनॉल बनवतात. जिल्ह्यात बिजनौर साखर कारखाना, चांदपूर कारखाना, बहादूरपूर कारखाना आणि बिलाई कारखाना इथेनॉल तयार करतो. त्यामुळे साखरेचे उत्पादन कमी झाले आहे. साखरेची निर्मिती अधिक झाली तर ऊस बिलांची समस्या वाढते.
बी हेवी आणि सी हेवी मोलॅसीसपासून कारखाने इथेनॉल बनवतात. बी हेवी इथेनॉलचा दर ५७ रुपये ४४ रुपये, सी हेवी इथेनॉलचा दर ४५ रुपये ६९ पैसे तथा रसापासून तयार होणाऱ्या इथेनॉलचा दर ६२ रुपये ५० पैसे आहे. इथेनॉलचा वापर पेट्रोल तसेच औषधे, सॅनिटायझर, स्प्रीट आदींमध्ये केला जातो.
धामपूर कारखान्याने ३२० लाख ६५ हजार लिटर, स्योहारा कारखान्याने २५७ लाख ३ हजार लिटर, नजीबाबाद कारखान्यात ४० लाख २५ हजार लिटर, बरकातपूर कारखान्यात २४५ लाख ३८ हजार लिटर, बुंदकी कारखान्यात ९७ लाख ९ हजार लिटर इथेनॉलचे उत्पादन केल्याची माहिती जिल्हा ऊस अधिकाऱ्यांनी दिली.
चीनीमंडी चे अपडेट्स व्हाट्सअप वर मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
WhatsApp Group Link