मुजफ्फरनगर : साखरेचे भांडार मानल्या जाणाऱ्या उत्तर प्रदेशच्या पश्चिम भागात प्रती हेक्टरी ऊस उत्पादनात शामली जिल्हा पहिल्या क्रमांकावर आला आहे. येथे प्रती हेक्टर १००४.२३ क्विंटल ऊस उत्पादन झाले आहे. तर मुजफ्फरनगर जिल्ह्यात ९२३.२० क्विंटल तर मेरठ जिल्ह्यात ९११.७६ क्विंटल प्रती हेक्टर उत्पादन आहे. या सरासरी ऊस उत्पादनात बुलंदशहर जिल्हा चौथ्या, गाजियाबाद पाचव्या, बिजनौर सहाव्या आणि बागपत जिल्हा सातव्या क्रमांकावर आहे.
राज्याचे ऊस तथा साखर आयुक्त संजय भुसरेड्डी यांनी सांगितले की, ऊस विभागाच्यावतीने राज्यातील ४५ ऊस उत्पादक जिल्ह्यांमध्ये उसाच्या तोडणीच्या आधारावर गळीत हंगाम २०२०-२१ या काळातील आकडेवारी जारी करण्यात आली आहे. ऊस विकास विभागाच्या योजनांच्या सुयोग्य वापराने तसेच शेतकऱ्यांनी घेतलेल्या मेहनतीमुळे २०२०-२१ या काळात राज्यात प्रती हेक्टरी सरासरी ऊस उत्पादन प्रती क्विंटल ८१५ इतक्या उत्पादनाचा उच्चांक निर्माण झाला आहे. सहारनपूर परिक्षेत्रात शामली जिल्हा १००४.२८ क्विंटल उत्पादन घेऊन उत्तर प्रदेशमध्ये पहिल्या क्रमांकावर आहे. तर मुजफ्फरनगर जिल्हा ९२३.२० आणि मेरठ जिल्हा ९११.७६ क्विंटल प्रती हेक्टर उत्पादन करून दुसऱ्या व तिसऱ्या क्रमांकावर आहे.