मवाना : मवाना साखर कारखान्याने १०२ कोटी रुपयांची ऊस बिले अदा केली आहेत. मवाना शुगर लिमिटेडतर्फे मवाना शुगर वर्क्स आणि नंगलामल येथे नंगलामल शुगर कॉम्प्लेक्स हे दोन कारखाने चालविले जातात. या कारखान्यांनी २०२०-२१ या हंगामात अनुक्रमे २०२.०८ आणि १०४.७८ लाख क्विंटल उसाचे गाळप केले आहे.
मवाना शुगर लिमिटेडने १०२ कोटी रुपयांची ऊस बिले शेतकऱ्यांना दिले. यामध्ये मवाना शुगर वर्क्सचे ५०.१९ कोटी रुपये आहेत. तर नंगलामल शुगर कॉम्प्लेक्सचे ५१.८१ कोटी रुपये आहेत. जिल्हा ऊस अधिकारी डॉ. दुष्यंत कुमार यांना याची अॅडव्हायजरी पाठविण्यात आली आहे.
मवाना शुगरचे प्रतिनिधी प्रमोद बालियान आणि नंगलामल शुगरचे प्रतिनिधी एल. डी. शर्मा यांनी सांगितले की, गळीत हंगाम २०२०-२१ यामधील उर्वरीत पैसे लवकरच दिले जातील. साखर कारखान्याच्या प्रतिनिधींनी सांगितले की, गेल्या दीड महिन्यात मवाना शुगर लिमिटेडने २८९ कोटी रुपयांची ऊस बिले दिली आहेत. त्यामध्ये मवाना कारखान्याचे १७६ कोटी रुपये तर नंगलामल कारखान्याच्या ११३ कोटी रुपयांचा समावेश आहे. शेतकऱ्यांनी आपले घोषणापत्र ऑनलाईन भरावे असे आवाहन करण्यात आले आहे.